पुण्यात राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे ह्यांची सून वैष्णवीने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केली. 2025 मध्ये ही हुंड्याची घृणास्पद प्रथा अजित दादांच्या पक्षातील लोक चालवत आहेत हे अत्यंत लाजिरवाणे आहे.एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणून 1500 द्यायचे आणि त्यांच्या नेत्यांनी हुंड्याची भीक मागायची हे अत्यंत नीच मानसिकतेचे प्रदर्शन आहे.एरवी चित्रपटात एखादा बोल्ड सिन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता कुठे आहेत?ह्या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी आहे. ह्या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे!