यंदा प्रथमच आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्री. विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी विक्रमी अशी भाविकांची नोंद नवीन एआयच्या तंत्रज्ञानामार्फत घेण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पूर्वी आषाढी वारी काळानंतर पंढरीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले जात असायचे यामुळे येथील स्थानिक नागरिकांना व भाविकांना वारी झाल्यानंतर अनेक संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागत होते. याची गंभीर दखल घेऊन मागील काही वर्षांपूर्वी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून पंढरीत गर्दीच्या ठिकाणी कायमस्वरूपी बहुमजली आत्याधुनिक पद्धतीचे ७ सुलभ शौचालय संकुल उभारले आहेत. यामध्ये एका संकुलामध्ये १०० ते २०० शौचालय, आंघोळ करण्यासाठी ५० स्रानगृहे, पिशव्या व इतर साहित्य ठेवण्यासाठी ५० लॉकर रूम करण्यात आली आहेत. याचा आषाढी यात्रेत मोठ्या प्रमाणात वापर भाविकांना होत असल्याने भाविक समाधान व्यक्त करत आहेत. या उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालय संकुलांमुळे भाविकांची सोय होत आहे. तसेच या सुलभ शौचालय संकुलांमुळे सर्वात्त मोठी अशी आषाढी यात्रा झाल्या नंतर ही पंढरीत सर्वत्र स्वच्छता पाहावयास मिळत आहे.
महाराष्ट्राचे आराध्या दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वर्षभरामध्ये लाखो भाविक दाखल होत असतात. नुकताच आषाढी वा री सोहळा वीस ते बावीस लाख भाविकांच्या साक्षीने पार पडला. या यात्रेसाठी माऊलींच्या पालखी सह इतर अनेक पालख्यांसमवेत सुमारे दहा लाख यात्रे दरम्यानच्या काळात सुमारे बावीस लाखांवर भाविक पंढरीत दाखल झाले होते असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या भाविकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात
आल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छतेवर भर देण्यात आला होता.यात्रेनंतर व कायमस्वरूपी पंढरीत स्वच्छता राहावी यासाठी नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट, दर्शन बारी, गोपाळपुर रोड नवीन एस, टी, स्टाँड, चंद्रभागा एस टी स्टैंड, गजानन महाराज मठ मागील परिसरात, संत कैकाडी महाराज मठ या गर्दीच्या ठिकाण कायमस्वरूपी सुलभशौचालय संकुल उभारण्यात आले आहेत. तसेच ६५ एकर भक्ती सागर परिसर, वाखरी पालखीत यासह इतर ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय नगरपालिकेने उभी केल्याने याचा वापर भाविकांना चांगल्या प्रकारे करता येत असल्याने पंढरीत आषाढी यात्रा संपल्यानंतर ही सर्वत्र स्वच्छता पहावयास मिळत आहे.
