पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढा तालुक्याते आमदार अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Shri Vitthal Cooperative Sugar Factory) बदनामी थांबवण्यासाठी एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याने 10 लाखाची खंडणी घेतली आहे. खंडणी घेतानाच पोलिसांच्या (Police) खंडणी विरोधी पथकाने पकडले त्या सामाजिक कार्यकर्त्याला पकडले आहे. अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबविण्यासाठी या कामगार नेत्याने एक कोटी रुपयाची मागणी केली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आज थोड्या वेळापूर्वी पंढरपूर शहरातील कॉलेज चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये 10 लाख रुपयाची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. सध्या पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या कामगार नेत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काही दिवासापूर्वी सेवानिवृत्त कामगारांनीही केलं होतं आंदोलन
गेल्या काही दिवसापूर्वी माढा तालुक्याचे आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याविरोधात कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार आणि व्यापारी आक्रमक झाले होते. पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर त्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अभिजीत पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने 347 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. कारखान्यास महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवर एनसीडीसी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून मागील थकीत देणी देण्याकरता 347.67 कोटी कर्ज मिळालेले आहे. त्या कर्ज रकमेपैकी व्यापारी पेमेंट रक्कम रुपये 59.75 कोटी रुपये तर कामगार पेमेंट रक्कम रुपये 41.87 कोटी मिळाले आहेत. परंतू ती रक्कम सदर व्यापारी व कामगार यांना अद्याप दिलेली नाही अशी माहिती व्यापारी संतोष भालेराव यांनी दिली होती. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या थकहमी कर्ज रकमेचा दुरुपयोग करुन शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती.
