पंढरपूर – आषाढ महिन्यामध्ये २० जुलै रोजी पंढरपूर होऊन अरण येथे संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी पांडुरंगाची पालखी पंढरपूरहून अरणला सावता महाराजांच्या भेटीला येते. यावेळी अरण ग्रामस्थ नियोजन करतात. मात्र, यंदाच्या वर्षी विठ्ठलाच्या पालखीचे व्यवस्थापन मंदिर समितीने करावे, अशी मागणी संत सावता महाराज देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट व भाविक भक्तांनी मंदिर समितीकडे केली आहे.पांडुरंगाची पालखी आणण्यासाठी अरण येथे बनवण्यात आलेल्या रथाला बैलजोडी जुंपून पंढरपूर ते अरण, मोडलिंब, जाधव वाडी, वैरागवाडी, पंढरपूर परिसरातील रोपळे, आष्टी, या भागातील भाविक मोठ्या संख्येने ३५ किलोमीटर पायी चालत जातात. मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाची पालखी रथामध्ये ठेवून अरणला घेऊन पायी येतात. संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टने केलेली मागणी विठ्ठल मंदिर समिती मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ट्रस्टचे सचिव सचिव प्रभू माळी यांनी सांगितले की, याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असून याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
