पंढरपूर – पंढरपुरातील आषाढी यात्रा संपताना एक धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला यामध्ये मनुष्यहानी झाली नसली तरी तीन कुत्र्त्यांना जीव गमवावा लागला आहे.शुक्रवारी सायंकाळी पंचमुखी मारुती मंदिरासमोरील मुखदर्शन रांगेतील उझणपुलात विद्युत करंटे उतरून तीन कुत्र्त्यांना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे. सुदैवाने या ठिकाणी मनुष्यहानी झाली नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी आक्रोश व्यक्त केल्यानंतर मंदिर समितीचे व्यवस्थापक श्रोत्री यांनी सदर ठिकाणी भेट दिली. त्यांना परिसरातील नागरिकांनी घेराव घालत मंदिर समितीच्या ठेकेदाराकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे हे घडले आहे. यामध्ये मनुष्यहानी झाली असती तर कोण जबाबदार असा जाब विचारत सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले होते.
यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक श्रोत्री यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृत झालेल्या तीन कुत्र्यांना नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन गेले. आषाढी यात्रेची सांगता झाली असली तरी भाविक दर्शनासाठी पंढरपूर गर्दी करत आहेत. याच दर्शन रांगेत पंचमुखी मारुती मंदिराच्या समोर असणाऱ्या उड्डाण पुलावर सायंकाळी ठेकेदाराच्या च कर्मचाऱ्यांच्या मूर्खपणामुळे वीज प्रवाह असलेली वायर पडली आणि विजेचा प्रवाह या उड्डाणपूल व शेजारील रांगेत उतरला सुदैवाने या भागातील दर्शन रांग थोडी पुढे गेली होती आणि यामुळे या उड्डाण पुलावर भाविक नव्हते. मात्र जेव्हा या उड्डाणपुलाला कुत्रे चिटकले आणि काही क्षणातच ते तडफडू लागले. त्याच्या पाठोपाठ इतर दोन कुत्रे-ही अशाच पद्धतीने विजेचा झटका लागून तडफडल्यावर परिसरातील नागरिकांना हा धक्कादायक प्रकार समजला आणि त्यांनी तात्काळ विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आधी हा विजेता प्रवाह खंडित केला आणि नंतर तुटलेल्या धोकादायक वावर बाजूला काढण्यात आल्या. दर्शन रांगेत लावलेले स्पीकर सोडवताना त्याने हिसका देऊन वायर तोडली आणि ती वायर तशीच या उड्डाण पुलावर पडली आणि अडकली. पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनाची रांग या पुलाच्याही पुढे गेली असून काल सायंकाळी विठ्ठलाच्या कृपेने या ठिकाणी कोणताही भाविक ररांगेत उभा नव्हता. अन्यथा संपूर्ण आषाढी यात्रा व्यवस्थित झाली असताना एक खूप मोठी दुर्घटना घडू शकली असती. आता या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या आणि भाविकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या सर्व प्रकारात दर्शन रांगेच्या ठेकेदाराचा गलथानपणा समोर आला आहे.
