पंढरपूर – आषाढी यात्रेनंतर पंढरपुरात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या संसर्गजन्य आजाराने नागरिक त्रस्त असल्याबाबतची बातमी शुक्रवारी दैनिक एकमत मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. याची दखल घेत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात घर टू घर आरोग्य तपासणी करून नागरिकांना गोळ्या औषधे दिले जात आहेत. शहरातील विविध भागात आरोग्य यंत्रणेद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी टीम तयार करण्यात
आल्या असून एका टीम मध्ये दोन डॉक्टर, दोन नर्स, आरोग्यमित्र यांच्यासह परिसरातील अशा वर्कर यांचा समावेश आहे. याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथून करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी आरोग्य तपासणी करून औषध गोळ्या घेण्यासाठी गर्दी केली होती.
नागरिक त्रस्त असल्याबाबतच्या बातम्या माध्यमामध्ये प्रसारित याप्रसंगी पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी एकमत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की आषाढी यात्रेनंतर संसर्गजन्य आजाराने झाल्यानंतर वारी झाल्यानंतरही सुट्टीच्या दिवशी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. शहरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या व्याधींसाठी जाग्यावर गोळ्या औषध दिल्या जात आहेत. नागरिकांनी माऊली बेघर निवारा, म्हाडा कॉलनी, काळा मारुती स-रकारी दवाखाना यासह जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आरोग्याची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन डॉ. बोधले यांनी केले आहे. यात्रेनंतर आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे
