सांगोला – पंढरपूर आषाढीवारीनिमित्त पंढरपूर येथून बुधवार २ जुलै ते शुक्रवार ११ जुलै या कालावधीत सांगोला आगाराच्या ७४ जादा बसेस सोलापूर, पुणे, कोल्हापूर, मिरज, गाणगापूर विदर्भ आदी विविध मार्गावर सुमारे ३८,४९१ किमी धावल्या. ३३३ फेऱ्यातून सुमारे २३ हजार ८३५ वारकरी भाविकांच्या वाहतुकीतून सांगोला आगारास सुमारे १९ लाख १० हजार ३३२ रुपयांचे फेन्या काळात आगारातून उत्पन्न मिळाल्याचे आगारप्रमुख विकास पोपळे यांनी सांगितले.वारीच्या सांगोला झाल्या आषाढी एकादशी निमित्त यात्रा कालावधीत वारकरी भक्तांच्या सेवेसाठी सांगोला आगाराचे उत्पन्न वाढवण्यासाठी जादा बसेस सोडल्या जातात. दरम्यान, याहीवर्षी आगारप्रमुख विकास पोपळे यांनी सांगोला आगारातून एसटीच्या २५ जादा बसेस सोडल्या होत्या. दरम्यान, रविवार ६ जुलै रोजी एकादशीच्या मुख्य दिवशी १७ बसेस ५,७२६ किमी धावल्याने ११२ फेऱ्यातून ५,५७६ प्रवाशांच्या चढ-उतारामधून एकाच दिवशी आगारास सुमारे ३ लाख ६२ हजार २८० रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दशीला १५ बसेस ६,९३० किमी धावल्याने ६८ फेऱ्यातून ३,४७६ प्रवाशांच्या चढ-उतारामधून ३ लाख २४ हजार ९३२ रुपये उत्पन्न मिळाले.
त्रयोदशी दिवशी ११ बसेस ८,०५८ किमी धावल्याने ४० फेऱ्यातून ३,५६९ प्रवाशांच्या चढ-उतारामधून ३ लाख ७८ हजार ८२८ रुपये तर चतुर्दशीला ७ बसेस ५,३८८ किमी धावल्याने २० फेऱ्यातून ११२७प्रवाशांच्या चढ-उतारामधून १ लाख ५० हजार २६५ रुपयाचे उत्पन्न तसेच गुरुपौर्णिमा दिवशी ३ बसेस १,३६६ किमी धावल्याने ६ फेऱ्यातून ९९१ प्रवाशांच्या चढ-उतारामधून १ लाख ३ हजार २०६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे
विद्यार्थ्यांची गैरसोय नाही
पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त सांगोला आगारातून ७४ जादा बसेस वारकरी भाविकांच्या सेवेसाठी सोडल्या होत्या. योगायोगाने एकादशी दिवशी रविवार असल्यामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही. त्याच एसटी बसेस पंढरपूर वारीसाठी सोडल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात अधिकची वाढ झाल्याचे आगारप्रमुख विकास पोपळे यांनी सांगितले.
