पंढरपूर– आषाढी यात्रा कालावधीत झालेल्या चोऱ्या उघडकीस आणून या गुन्ह्यातील ट्रॅक्टर व पाण्याच्या शेतीपंपासाठी वापरणाऱ्या पाच मोटरी, तसेच एक मोटरसायकल असा एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. गुरसाळे (ता. पंढरपूर) या गावी दिनांक रोजी ३० जून रोजी रुपेश अजितराव देवकाते (वय २७, रा. घोसाळे) यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटारी चोरीस गेल्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ४ आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला. पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटारी किंमत रुपये दोन लाख पंधरा हजार जप्त केला
ट्रॅक्टर सापडला चळेमध्ये
वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस २ जुलै रोजी स्वामी दत्त कृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखीमधील ट्रॅक्टर चोरीला गेला होता. याबाबत वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याबाबत तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर चळे (ता. पंढरपूर) या गावातून जप्त केला असल्याचे पोनि. टी. वाय. मुजावर यांनी सांगितले
