पंढरपूर – आषाढी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन देवाचे २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती, आदी राजोपचार बंद करण्यात आले होते, तर राजोपचार प्रक्षाळ पूजा सुरु करण्यात असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचे मुखदर्शन किंवा पदस्पर्श दर्शन मिळावे हीच इच्छा असते. गर्दी असल्याने १८ ते २५ तास भाविकांना दर्शन रांगेत थांबावे लागते. देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळावे यासाठी काही पूजा बंद करून दर्शन वेळ वाढविण्याचा प्रयत्न मंदिर समितीकडून करण्यात येतो. श्रींचा काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती, आदी राजोपचार बंद करण्यात आले होते. तर नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. विठ्ठल भाविकांना २४ तास दर्शन देण्यासाठी विठ्ठल उभा राहणारा असल्याने, विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. १६ जलैला प्रक्षाल पजा करण्यात येणार आहे.
