पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी या आठवड्यात ज्या लोकांना अटक केली आहे, त्यात हरियाणाची ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राचा देखील समावेश आहे.हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद माहिती सापडली आहे.ज्योतीच्या विरोधात ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 152 अंतर्गत (भारताचं सार्वभौमत्व, ऐक्य आणि अखंडतेला धोका निर्माण करणारं कृत्य केल्याबद्दल) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अटक झाल्यापासून ज्योतीच्या पाकिस्तान प्रवासाची खूपच चर्चा होते आहे. याशिवाय तिचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या डिनर पार्टीचा हा व्हिडिओ आहे.