पंढरपूर – सरकारने कॉरिडॉरबाबत आपले मत मांडल्यावर त्यात काय बाधित होणार आहे, त्याचे फायदे काय होणार आहेत, हे शहर व तालुक्याने समजून घेणे गरजेचे आहे. यंदाच्या आषाढी वारीला मोठी गर्दी झाली होती, एखादी घटना घडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे, यामुळे कॉरिडॉर होणे गरजेचे असल्याचे आ. अभिजित पाटील यांनी सांगितले.पंढरपूर येथे आ. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे विश्वासू नितीन सरडे, शंकर साळुंखे, परवेज मुजावर उपस्थित होते.टक्के लोक द्यायला असतील पुढे आ. पाटील म्हणाले, कॉरिडॉर तीन टप्प्यात होणार आहे. त्या विविध टप्प्यादरम्यान लोकांची मानसिकता होते. त्या लोकांना स्थलांतरित करणे, शहरात व शहराच्या आजूबाजूला मिळणाऱ्या सुखसुविधांमुळे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. बाधित होणाऱ्या एकूण लोकांपैकी ५० टक्के लोक तुम्हाला जागा द्यायला तयार असतील तर त्यांच्या जागा घ्याव्यात. त्यांच्या जागेवर काय येणार आहेत, काही प्रॉपर्टी उद्या राहतील का? त्यांना काही काळ दिला पाहिजे, त्याचा व्यवसाय आहे, त्याचा व्यवसाय लगेच बंद करणे, आणि त्याला लगेच
स्थलांतरित करणे, त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत.
पहिला टप्प्यामध्ये शहराच्या आजूबाजूचा विकास करणे, त्यामध्ये बाधित लोकांना स्थलांतरित करता येईल का याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुकानाला दुकान देणार हे कॉरिडॉरमध्ये सांगितले गेले आहे. पहिल्यांदा दुकानाची जागा ताब्यात घेऊन सहा महिन्यात दुकाने तयार करावीत. मग बाधित लोकांची दुकाने स्थलांतरित करावीत, यातून बाधित लोकांच्या व्यवसायाचा मेळ बसेल. जागा तयार तर घ्या..
सरकारची मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची चर्चा करण्याची भूमिका आहे. त्यांना आता नकाशे मागितले आहेत. त्यानंतर सरकारने मांडल्यावर त्यात काय बाधित होणार आहे, त्याचे फायदे काय होणार आहेत, हे शहर व तालुक्याने समजून घेणे गरजेचे आहे. सरकारने सांगितलेली गोष्ट आपण न समजून घेता त्याच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य राहील.
तीन टप्प्यात कॉरिडॉर
पंढरपुरात कॉरिडॉर झाला पाहिजे, तीन टप्प्यांमध्ये कॉरिडॉरचे काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराजवळ पाडझड करायची आहे, दुसऱ्या टप्प्यात शहरातील सुख सुविधा आणि तिसऱ्या टप्प्यात बायपास रोड व रिंगरोडच्या असणाऱ्या सुखसुविधा असणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
