श्रीहरिकोटा – ‘नासा’ व ‘इस्रो’ने संयुक्तपणे तयार केलेला सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह ‘निसार’ (NISAR) बुधवारी यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी ५:४० वाजता ‘जीएसएलव्ही-एफ१६’ रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.‘निसार’ उपग्रह २,३९३ किलोग्रॅम वजनाचा असून तो अवकाशात नियोजित कक्षात स्थापित करण्यात आल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. हा उपग्रह ७४३ किमी उंचीवर, ९८.४ अंश कललेल्या सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित करण्यात आला. ‘निसार’ ७४७ किमी उंचीवर असलेल्या ध्रुवीय कक्षेत फिरेल. ध्रुवीय कक्षा म्हणजे अशी कक्षा ज्यामध्ये उपग्रह पृथ्वीच्या ध्रुवांवरून जातो. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.
