श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारावर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून गेल्या का-ही महिन्यांपासून विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. मंदिर समितीचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला असून समितीचे मुख्य अध्यक्ष पद रिक्त असल्याने सहअध्यक्षामार्फत कारभार चालवला जात आहे. परिणामी समिती बरखास्त करून नूतन समिती अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवक्रांती संघटनेच्या वतीने केली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी याबाबत निवेदन मंदिर समिती कार्यकारी अधिकाऱ्याकडे केले आहे. मंदिर सुरक्षेचा अनुभव नसणाऱ्या बीव्हीजी कंपनीला ठेका देऊ नये. अशी मागणी शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी निवेदनाद्वारे मंदिर समिती कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे. मागण्यांबावत योग्य निर्णय न झाल्यास 26 मे पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, भास्कर जगताप, स्वप्निल गायकवाड उपस्थित होते.मंदिर समितीकडून बीव्हीजी ग्रुपला मंदिर सुरक्षेच्या ठेका देण्यात आला आहे. काम केल्याचा अनुभव नाही. सदर सुरक्षेबाबत कंपनीवर अनेक ठिकाणी समाधानकारक काम नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. १०८ अॅम्बुलन्स सेवा देण्याचा ठेका त्यांच्याकडे आहे. परंतु कंपनीची सेवा समाधानकारक नसल्याने ५०% काम काढून घेण्यात आले आहे. असा आरोप करण्यात आला असून मंदिर सुरक्षेचा अनुभव नसणाऱ्या आशा चुकीच्या पद्धतीने काम व राजकीय दबाव टाकून निविदा मिळवणाऱ्या कंपनीला ठ-‘का देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
वरील मागण्यासाठी मंदिर प्रशासनाला अखिल भारतीय छावा संघटना, शिवस्वराज्य संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीनेही निवेदन देण्यात आले आहे.