नवी दिल्ली – केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेले प्राप्तिकर विधेयक काही कारणास्तव मागे घेतले आहे. या विधेयकाऐवजी आता नवीन विधेयक सरकार आणणार आहे.
सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये लोकसभेत प्राप्तिकर विधेयक सादर केल्यानंतर ते स्थायी समितीकडे पाठवले होते. या समितीतील सदस्यांची सूचना स्वीकारल्यानंतर सरकार आता नवीन विधेयक आणणार आहे.
केंद्र सरकारने नवीन प्राप्तिकर विधेयक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकसभेत सादर केले. त्याच दिवशी त्यांनी ते विधेयक स्थायी समितीकडे पाठवले. समितीने २२ जुलै २०२५ रोजी आपला अहवाल संसदेला सादर केला. नवीन प्राप्तिकर सुधारित विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता लोकसभेत हे सुधारित विधेयक ११ ऑगस्टला सादर केले जाईल.
