मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत व आदित्य ठाकरे हे दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत अगदी मागच्या रांगेत बसल्याचे दिसून आले होते. यावरून सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, “आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले होते. त्यामुळे तिथे त्यांचा काय मान-सन्मान आहे, तो आपल्या लक्षात आलेला आहे. भाषणात खूप म्हणायचं, दिल्लीसमोर मान झुकणार नाही. दिल्लीसमोर आम्ही पायघड्या टाकणार नाही आणि आता दिल्लीत काय परिस्थिती आहे? ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे, हे बघितल्यानंतर थोडं दु:ख होतं, पण ठिक आहे.”
