पंढरपूर – भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या कॉरिडॉरमध्ये पंढरपुरातील २८ ते ३० मठ बाधित होणार आहेत; परंतु त्यांच्या पूजा-अर्चना सुरू राहाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. किती मठ जातील आणि किती मठ वाचवता येतील, यावर विचारविनिमय सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी सीमा होळकर, सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगुटे, हभप राणा महाराज भास्कर, महेश महाराज देहूकर, चैतन्य महाराज देगलूरकर, स्वामी महाराज राशिनकर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुविधेसाठी पंढरपुरात कॉरिडॉर होणारच आहे, यामुळे यापुढे कॉरिडॉर होणार की नाही, या विषयावर चर्चा होणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ऋषिकेश महाराज उत्पाद, भागवत महाराज चवरे, मदन महाराज हरिदास, आशुतोष महाराज बडते, कौस्तुभ गुंडेवार, अभयसिंह कुलकर्णी, प्रफुल्ल जोशी, रामकृष्ण महाराज वीर उपस्थित होते.
याप्रसंगी वारकरी संप्रदायाला विश्वासात न घेता, कॉरिडॉर होत आहे. विकास आरखडा तयार केला जात आहे, असे मत व्यक्त होत होते. यामुळे वारकरी संप्रदायातील प्रमुख लोकांशी चर्चा केली.विकार आरखडा तयार करताना आमच्या सूचना घेऊन आरखडा तयार करावा, अशी मागणी केली. आम्ही त्यांच्या सूचना घेऊन आवश्यकतेनुसार आरखड्यात काही बदल करणार आहे. त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन त्यांना समाधानी कसे करता येईल, याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. बाधित लोकांसमोर उत्तम मोबादला देण्यासंदर्भात चर्चा केली आहे.
कॉरिडॉर शिवाजी चौकातून होणार नाही, तर चौफाळा येथूनच होणार आहे. कॉरिडॉरमध्ये व्यापाऱ्यांना गाळे देण्यासाठी ६०० च्या आसपास गाळे तळमजल्यात होणार आहेत.
होळकर व शिंदे वाडा वास्तूंचे होणार जतन
कॉरिडॉरमध्ये मंदिर व समाधी यांना हात लावणार नाही, तसेच होळकर व शिंदे वाडा या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांना आम्ही बाधा पोहोचविणार नाही. त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
