पांढरपूर – स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे स्मृती प्रित्यर्थ व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय व्होलीबॉल स्पर्धेचे आयोजन पंढरपूर तालुका दूध संघ, सुधाकरपंत परिचारक वाहतूक संस्था व दुध पंढरी हॉलीबॉल संघ इसबावी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते दूध पंढरी इसबावी येथील मैदानावर रविवारी मोठ्या दिमाखात पार पडले.या व्होलीबॉल स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले असून राज्यभरातील २२ संघाने सहभाग नोंदवला आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष मस्के, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब माळी, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, समाजसेवक सचिन शिंदे, वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक जयमिलिंद कदम, माजी नगरसेवक गणेश अधटराव, पंढरपूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष नागनाथ क्षिरसागर उपस्थित होते.याप्रसंगी गजेंद्र पवार, अविनाश कदम, शिवाजी भोसले, सखाराम भराटे, शशी भोसले, संतोष गायकवाड, शामराव माने, रघुनाथ अधटराव उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना अभिवादन करून पंढरपूर आणि परिसरात चांगले खेळाडू घडावेत यासाठी गेली वीस वर्षापासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते असल्याचे आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की पंढरपूर आणि परिसरात मोठे आत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्फत पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याचा मानस मस्के यांनी व्यक्त केला.
