अकलूज – हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशनतर्फे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. संत नामदेव महाराज यांचे वंशज ह. भ. प. केशव महाराज नामदास आणि संत सावता माळी महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.वामनभाऊ उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील भीमानगरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील घाटणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सप्तश्रृंगी पतसंस्थेचे चेअरमन अतुल चव्हाण, देवानंद गुंड, भारत शिंदे, तुकाराम मस्के यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विलास देशमुख, दादासाहेब जामगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज देशमुख, कुर्मदास साखर
कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधीर पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशिगंधा कोल्हे, ज्योती कुलकर्णी, विनंती कुलकर्णी, माजी उपसभापती बाबूराव सुर्वे, प्रताप नलावडे, डॉ. शरद मोरे, पोपट अनपट, केशव गायकवाड, बालाजी पाटील, अरणच्या सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, काकासाहेब पाटील, माणिक लांडे, शांतीलाल बागवाले, संत सावतामाळी विद्यालयाचे प्राचार्य सुहास माळी, प्राचार्य कुबेर कोरडे, फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे उपस्थित होते.
यावेळी वृक्ष वाटप व संगोपन स्पर्धा पार पडली. याठिकाणी ५०० रोपांचे वाटप करण्यात आले. याकरिता शेंडगे हॉस्पिटल, अरण यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर बुधरानी हॉस्पिटल यांच्यामार्फत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५० रुग्णांची तपासणी झाली. तसेच डॉ. पाटील मोहोळ यांच्यामार्फत विद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांचे डोळे तपासले. यावेळी घेतलेल्या शिबिरात १२१ जणांनी रक्तदान केले.
