अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा
CIBIL स्कोरसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँका व अधिकाऱ्यांवर कारवाई करा
पंढरपूर- तालुक्यातील अनेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे सरकारने अनेक वेळा शेतकऱ्यांना कर्ज देत असताना सिबिल बघू नका, सिबिल साठी शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण थांबवू नका अशा कडक सूचना दिलेल्या असतानाही सर्रास बँका सरकारचा आदेश केराच्या टोपलीत टाकून मनमानी कारभार करत आहेत
यंदा पाऊस लवकरच पडल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची मशागती, पेरणी, नवीन लागवड, खते बी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असताना वेग वेगळी करणे दाखवून टाळाटाळ करतात अनेक दिवस वेळ वाया घालवतात त्यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जातो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे सर्व बँकांना दिलेल्या टार्गेट प्रमाणे फास्ट पिक कर्ज वाटपाच्या सूचना द्याव्यात
तसेच मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी
अन्यथा शेतकऱ्यांना सिबिल साठी अडवणूक करणाऱ्या बँका विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना खळ खट्याक आंदोलन करेल होणाऱ्या नुकसानीस आपण व शासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असं इशारा देण्यात आला
सचिन अटकळे, महादेव शिंदे, सुधीर लिगाडे चंद्रकांत सावंत उपस्थित होते
