पंढरपूर – ज्येष्ठा गौरी आवाहननिमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्यांचा कंगनजोड, मोत्यांचा तुरा, मोत्यांची कंठी, मारवाडी पेट्याचा मोत्यांचा हार, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, मोहनमाळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ, नाम निळाचा, तर रुक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कमरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.याशिवाय राधाष्टमी (श्री राधिक मातेचा जन्म दिवस) असल्याने मंदिरातील श्री राधिका मातेस पांढरा पोशाख व सोने-मोत्यांचे अलंकार परिधान करण्यात आले व गुलाल टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये सोन्याचा नक्षी टोप, मोत्यांचा कंठा, खड्यांच्या पाटल्या जोड, मोत्यांचे मंगळसूत्र, बाजीराव गरसोळी आदी अलंकाराचा समावेश आहे. यावेळी मंदिर समितीचे सदस्य हभप प्रकाश जवंजाळ व विभागप्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते. रात्री ८ वाजता श्री राधिकामातेसमोर भजन केले जाणार आहे.
