पंढरपूर – मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे सोमवारी उपोषण स्थळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी भेट देऊन पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या पाठिंब्याचे पत्र दिले.प्रणव परिचारक यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईला पाठिंबा दिला. आरक्षण मिळण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. या प्रसंगी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रणव परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या मराठा समाज बांधवांशी भेट घेऊन विचारपूस केली.
