इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं आहे. राज्यात तब्बल 211 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारी प्रियंका कांबळे हिने दहावीची परिक्षा क्रॅक केली आहे. तिने स्वच्छतेचे काम आणि शाळा, अभ्यास तसेच प्रापंचिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी सांभाळून दहावीच्या परीक्षेत 47.60% गुण मिळवले.