महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरुन मराठा आणि ओबीसी समाजात प्रचंड तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले. ज्यांना गरज आहे, त्यांनाच आरक्षण मिळावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सुप्रिया सुळे यांचे हे विधान मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर आले आहे. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जाती ऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण ठेवले पाहिजे. आरक्षण त्यांनाच दिले पाहिजे, ज्यांना त्याची खरंच गरज आहे. माझे आई-वडील सुशिक्षित आहेत, मी स्वतः चांगले शिक्षण घेतले आहे, माझी मुलंहीशिकलेली आहेत. मग मी आरक्षणाची मागणी करणे लाजिरवाणे ठरेल. आरक्षण त्या व्यक्तींसाठी आहे, ज्यांना शिक्षण घेता आले नाही आणि ज्यांना त्याची खरी गरज आहे. σιν वाहिनीवरीला कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यात आला की, आरक्षण जातीनुसार असावे की, आर्थिक निकषावर ? यावर उपस्थितापैकी अनेकांनी आर्थिक निकषावर आरक्षणासाठी हात वर केले. हा प्रतिसाद पाहून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी जेन-झेड शी कनेक्ट होऊ शकले, यासाठी देवाचे आभार मानते. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या बहुतांश मागणी मान्य केल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पात्र मराठा बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा होता, ज्यामुळे त्यांना इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभमिळू शकेल.
