DCIM100MEDIADJI_0074.JPG
श्रीपुर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा ३५ वा बॉयलर अग्नि प्रदीपण समारंभकारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्याहस्ते मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर झाला. कारखान्याचे संचालक भगवान भिम चौगुले व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली चौगुले यांच्याहस्ते श्री सत्यनारायण महापूजा झाली. चेअरमन मा.आ. प्रशांतराव परिचारक यांनी हंगाम २०२५-२६ साठी कारखान्याकडे सुमारे १२ लाख मे.टनाच्या ऊस नोंदी आहे.सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झालेल्या अतीवृष्टीमुळे ऊसाचे नुकसान होवू नये म्हणून कारखाना व्यावस्थापण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी गळीत हंगामात कारखाना सुमारे प्रतिदिन ९५०० मे.टन ऊस गाळप करणार आहे. करार केलेल्या तोडणी वाहतूक यंत्रणेकडून पुरेशा ऊसाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे कारखाना पहिल्या दिवसापासूनच पूर्ण कार्यक्षमतेने चालविणार आहोत. यासाठी आवश्यक असणाऱ्या तोडणी वाहतूक यंत्रणेच्या अॅडव्हांन्स हप्त्याचे ही वाटप कारखान्याने केले आहे. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, उमेश परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमार, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरु वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शाम साळुंखे, मधुकर पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
