मोहोळ विधानसभा मतदार संघातील चार गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब आमदार राजू खरे यांच्या निदर्शनास येतात, त्यांनी 17 मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री नामदार गोरे यांनी सदरचा प्रश्न मिटविण्याबाबत शब्द दिला होता. या प्रश्नावर आज बुधवारी कालवा सल्लागार समितीची बैठक घेत जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांचेसमोर आगृह घरीत यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देताना आ. राजू खरे यांच्या मागणीची दखल घेत, कोळेगाव एस के एफ 22 मधून सिना नदीत पाणी सोडण्याबाबतच्या ऑनलाईन सूचना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहेत. यामुळे त्या चार गावचा पाणी प्रश्न मिटणार असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाची आमदार राजू खरे यांनी दिली आहे. मोहोळ मतदार संघातील मुंडेवाडी, अर्जुनसोंड, पोफळी, नांदगाव या गावांतील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत आमदार राजू खरे यांनी आवाज उठवला, यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आज बुधवारी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जलसंपदा मंत्री विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजू खरे, आ.समाधान अवताडे, आ. बाबासाहेब देशमुख, आ अभिजीत पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. उत्तमराव जानकर आ. नारायण पाटील, आणि आ. सुभाष देशमुख तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, सुधीर खांडेकर व जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
