राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या (Nagaradhyksha Reservation) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी 74 नगरपंचायतींमध्ये (Nagarpanchayat Election) नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असेल. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (SC category) प्रवर्गासाठी राखीव असेल. तर 7 नगरपंचायतींमधीळ नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (ST category) आणि ओबीसी प्रवर्गासाठी 20 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असेल. सोडत काढून नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आयत्यावेळी नगराध्यक्षपद वेगळ्याच प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता राजकीय पक्षांना त्याठिकाणी नवे चेहरे शोधावे लागणार आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचा फायदा किंवा तोटा कोणत्या राजकीय पक्षाला होणार, याविषयी आता राजकीय वर्तुळात विश्लेषण सुरु झाले आहे. तसेच राज्यातील 247 नगरपरिषदांमध्येही नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये 17 नगरपरिषदा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, 34 नगरपरिषदा ओबीसी महिला प्रवर्ग आणि 68 नगपरिषदांमधील नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे.
Nagarpanchayat Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव
बोधनी रेल्वे
नीलडोह
गोंडपिंपरी
अहेरी
बेसापिंपळा
कोरची
ढाणकी
धानोरा
बहादूरा
Nagaradhyksha Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर
भिवापूर
अर्जुनी(मोरगाव)
देवळा
समुद्रपूर
सिरोंचा
हिंगणा
पाली
OBC Reservation Nagarpanchayat: या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव
पारनेर- ओबीसी राखीव
तळा- ओबीसी राखीव
घनसावंगी- ओबीसी राखीव
भामरागड- ओबीसी राखीव
माळशिरस- ओबीसी राखीव
आष्टी बीड – ओबीसी राखीव
एटापल्ली- ओबीसी राखीव
झरी जामणी – ओबीसी राखीव
मंचर- ओबीसी राखीव
पाटोदा- ओबीसी राखीव
खानापूर- ओबीसी राखीव
माढा- ओबीसी राखीव
पोंभुर्णा- ओबीसी राखीव
माहूर- ओबीसी राखीव
वडवणी- ओबीसी राखीव
पोलादपूर- ओबीसी राखीव
आटपाडी- ओबीसी राखीव
खालापूर- ओबीसी राखीव
मालेगाव जहांगीर- ओबीसी राखीव
शिरूर अनंतपाळ- ओबीसी राखीव
पालम- ओबीसी राखीव
कळवण- ओबीसी राखीव
मंठा- ओबीसी राखीव
सावली- ओबीसी राखीव
कोंढाळी – ओबीसी राखीव
जाफराबाद- ओबीसी राखीव
चाकूर- ओबीसी राखीव
तीर्थपुरी- ओबीसी राखीव
कणकवली- ओबीसी राखीव
शिरूर कासार- ओबीसी राखीव
आष्टी वर्धा– ओबीसी राखीव
विक्रमगड- ओबीसी राखीव
अकोले- ओबीसी राखीव
जिवती- ओबीसी राखीव
मोखाडा- ओबीसी राखीव
कर्जत अहिल्यानगर – ओबीसी राखीव
सुकाना- ओबीसी राखीव
