नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर खात्याची जबाबदारी मिळाली आहे. शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडेच असलेले परंतु, मध्यंतरी धनंजय मुंडेंकडे फिरून आलेले अन्न व नागरी पुरवठा खाते पुन्हा भुजबळ यांच्याकडे आले आहे.छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असे सोमवारी सायंकाळी सांगण्यात आले होते. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल असे कयास बांधले जात होते. हे खाते मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याने अजित पवारांकडे होते.
