मुंबई – भारतात सध्या प्रत्येक जण दुसऱ्याला पेमेंट करताना ‘यूपीआय’ पेमेंट करतो. हे पेमेंट करताना ‘यूपीआय’धारकांना ‘पिन’ टाकावा लागतो. आता हे ‘यूपीआय’ व्यवहार करताना ग्राहकांना चेहरा किंवा बोटांचे ठसे सक्तीचे होण्याची चिन्हे आहेत. बुधवारपासून ही बायोमेट्रिक प्रणाली सक्तीची होण्याची शक्यता आहे. ‘यूपीआय’वर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘एनपीसीआय’ने बायोमेट्रिक फिचर्सना मंजुरी देण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर ‘यूपीआय’ पेमेंट करण्यासाठी ‘पिन’ची गरज पर्यायी राहील.बायोमेट्रिक पेमेंट करायला आता बोटांचे ठसे, चेहरा आदींची गरज लागणार आहे. हे पिन किंवा पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित असतील. त्याची नक्कल करणे कठीण बनेल. आपण सध्या स्मार्टफोनला बोटांचे ठसे किंवा चेहऱ्याचा वापर करून अनलॉक करतो. आता नवीन पद्धतीनुसार, तुमच्या पेमेंटला मंजुरी मिळण्यासाठी तुमचा डेटा हा आधार कार्डमधील बायोमेट्रीक माहितीसोबत पडताळून पाहिला जाईल.
सर्वच ‘यूपीआय ॲॅप’मध्ये लागणार
ही बायोमेट्रीक प्रणाली सर्वच ‘यूपीआय’मध्ये सहाय्य ठरेल. सुरुवातीला गुगल पे, फोन-पे, पेटीएम आदी मोठ्या ‘यूपीआय ॲॅप्स’मध्ये हे फीचर पाहायला मिळेल.
