पंढरपूर – पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी १८ प्रभागाचे नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाले. अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी ४, अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी २ तर १० जागा (ओबीसी) इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित केल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक ६ पुरुष, प्रभाग क्रमांक १७ पुरुष, प्रभाग क्रमांक १४ महिला, प्रभाग क्रमांक ११ महिला एस.सी प्रवर्गासाठी राखीव आरक्षण आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक ४ पुरुष व ९ एसटी महिलांसाठी आरक्षित आहे. ओबीसीसाठी प्रभाग क्रमांक १२ महिला, प्रभाग क्रमांक १५ पुरुष, प्रभाग क्रमांक जाहीर महिला, प्रभाग क्रमांक १८ पुरुष, ३ महिला, प्रभाग क्रमांक ५ प्रभाग क्रमांक १ पुरुष, प्रभाग क्रमांक १६ पुरुष, प्रभाग क्रमांक १० महिला, प्रभाग क्रमांक १३ महिला, प्रभाग क्रमांक २ पुरुष असे आरक्षण आहे. खुला प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १,२,४,६,७,८,१५,१६,१७,१८ या महिला खुला प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक ३,५,९,१०,११,१२,१४,१४ या खुला पुरुषांसाठी आरक्षण जाहीर केले आहे,
