श्रीपूर – कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने दिपावलीसाठी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप ऊसास प्रतिटन रु.१२६/- प्रमाणे ऊस बिल ऊस उत्पादक, सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. कर्मचाऱ्यांनाही १४ टक्के प्रमाणे बोनस देवून कामगार व उस उत्पादकांची दिवाळी गोड केली आहे. कारखान्याच्या परंपरेप्रमाणे दिपावलीसाठी ऊस उत्पादकांना ऊस बिलाचा अंतिम हप्ता दिला आहे. या हंगामात गाळप केलेल्या ऊसास प्रतीटन रु.२,९०१/- इतका दर दिल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ प्रशांत परिचारक यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते. चेअरमन मा.आ. प्रशांतराव परिचारक यांनी कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना दिपावलीसाठी पैशाची गरज असल्याने त्यांना ऊस बिलाचा अंतिम हप्ता देणेची परंपरा आहे. त्याचप्रमाणे कामगारांनाही बोनस देणेची परंपरा जपल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्यांने गळीत हंगाम २०२४-कारखान्याचे २५ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती टन रु.१२६/- प्रमाणे एकूण रक्कम रु.१० कोटी, कामगारांना बोनसपोटी रु.३.९० कोटी बँकेत वर्ग केली आहे. ऊस उत्पादकांना एफ. आर. पी. पेक्षाही ज्यादा रक्कम अदा केल्याचे सांगितले. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याकडे सुमारे १५ हजार हेक्टर ऊस क्षेत्राच्या नोंदी आहेत. त्यामधून सुमारे १२ ते १३ लाख टन ऊस उपलब्ध होईल. या सर्व ऊसाचे गाळप करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा मानस आहे. त्यासाठी कारखान्याची ऑफ सिझनमधील सर्व कामे पुर्ण झाली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक दिनकर मोरे, उमेश परिचारक, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
