महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र भर पसरत आहे. या प्रकरणात बीडचा देखील सातत्याने उल्लेख होत आहे. महिला डॉक्टरला सतत तुम्ही बीडचे लोक असं काम करता, अशापद्धतीचे टोमणे मारले जात असल्याच डॉक्चरने आपल्या लेखी तक्रारात म्हटलं आहे. या दरम्यान आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान कुटुंबाकडून सर्व घटनेची माहिती धनंजय मुंडे यांनी जाणून घेतली. या प्रकरणात प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही असा आक्रमक पवित्रा मुंडेंनी घेतला.
