श्रीपूर – कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२६ चा मोळी पूजन समारंभ कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रथम मोळीचे पूजन कारखान्याचे तज्ज्ञ संचालक दाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक मालक यांनी सांगितले की, गळीत हंगाम सुरू करण्याचे दृष्टीने कारखान्याची संपूर्ण तयारी झाली आहे.यावर्षी कारखान्याने ऊस गाळपाचे १२ लाख मे. टन उद्दिष्ट ठेवले असून १२ लाख क्विंटल साखर उत्पादित केली जाईल असे सांगितले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, उमेश परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील उपस्थित होते.
