पंढरपूर – कार्तिकी शुध्द एकादशीला म्हणजे २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा होत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्याहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा आयोजित केली आहे. यात्रेचा कालावधी २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर असा आहे. या यात्रेला सुमारे १० ते १२ लाख भविक पंढरपूरात येतात. भाविकांसाठी दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर वॉटरप्रुफ कक्ष, दर्शन रांगेत बसण्याची सुविधा, ताडपत्री शेड, जादा दर्शनमंडपाची निर्मिती, आपत्कालीन मार्ग, विश्रांती लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा, खिचडी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. गर्दी विचारात घेता, सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य दिले आहे. दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी अनुभवी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र, स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आ-हे. याशिवाय, आरोग्य विभागामार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व रिध्दी सिध्दी दर्शनमंडप येथे आयसीयु, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत. याशिवाय, सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांसह, यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १२५ सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्ट-ड, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली आदी व्यवस्था केल्याचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले. मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचाऱ्यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता आऊटसोर्सिंग पध्दतीने करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत आहे. दर्शनरांगेत नवमीपासून चहा-शाबुदाणा, तांदळाची खिचडी तसेच रिध्दी सिध्दी दर्शनमंडप येथे दशमी, एकादशी व द्वादशीला अन्नछत्र सुरू करण्यात येणार आ-हे. त्याचबरोबर मंदिर समितीचे संकेतस्थळ (www.vitthalrukmini-mandir.org), मोबाईल अॅप (“श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान, पंढरपूर”) वरून श्रीचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून पत्राशेड दर्शन रांग व मंदिर परिसरात एल.ई.डी. स्क्रिन बसविण्यात येत आहे. मंदिर समितीचे सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड. माधवी निगडे, अतुलशाखी भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजी मोरे परिश्रम घेत आहेत. सुमारे २५०० कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ह.भ.प.प्रकाश जवंजाळ,यांनी दिली
