पंढरपूर : पांडुरंगाला गोरगरिबांचे दैवत मानले जाते. विठ्ठलाच्या चार प्रमुख मोठ्या वाऱ्या असतात. या प्रमुख वाऱ्यांत देशाच्या कानाकोपऱ्यांतून कलाकार पैसे मिळवून पोट भरण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात. गेल्या ५० वर्षापासून पुणे येथील सुवर्णा चांदणे व आनंदा मंडलिक हे नऊ अंध पांडुरंगाची गाण्याची कला सादर कलाकार घेऊन प्रत्येक पांडुरंगाच्या वारीला अभंग व करतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ६५ एकरांकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बसून भाविक पैसे देऊ अगर न देऊ याचा विचार करता अखंडपणे अभंग व विठ्ठलाची गाणी दोन अंध महिला गायिका व सात अंध पुरुष गायक कला सादर करतात. मात्र, सध्या महागाईच्या युगात दहा ते अकरा लोकांचा जेवणाचा व इतर खर्च परवडत नाही. मात्र, गेल्या ५० वर्षापासून आम्ही पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना गाण्याच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम करत असल्यामुळे ही परंपरा सुरू ठेवण्याचे काम आम्ही करत असल्याचे सुवर्णा चांदणे यांनी सांगितले.
अंध कलाकारांना घेऊन गेल्या पाच दिवसांपासून कार्तिकी वारीमध्ये भाविकांना गाण्याच्या माध्यमातून पांडुरंगाची सेवा करण्याचे काम आम्ही करत आहे. आम्ही दहा ते अकरा कलाकार असून राहणे, जेवणाचा व इतर खर्च सोडून वारीच्या कालावधीत पाच ते दहा हजार रुपये मिळतात. गायनाच्या रूपात पांडुरंगाची सेवा करत आहोत.
आनंदा मंडलिक, पुणे
