सांगोला तालुक्यातील पिकांना व फळबागांना जीवदान देण्यासाठी तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी टेंभूचे आवर्तन सुरू करून माण नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाणी माण नदीत सोडले आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी माण नदीत सोडल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगोला तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ टेंभू योजनेचे आवर्तन स-रू करून माण नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निवाळकर यांच्याकडे केली मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री होती. दरम्यान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह अधिकारी व आमदार उपस्थित होते. यावेळी चेतनसिंह टेंभूच्या पाण्यामुळे बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, गांजरी, देवळे, मेथवडे या गावासह अन्य १५ ते २० गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. केदार सावंत यांनी सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीची माहिती देत विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आ-है. नदी, तलाव, बंधारे ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी माण नदीत सोडण्याची मागणी केली होती.
मागणीची दखल घेत टेंभू उपसा सिंचन योजनेतून माण नदीत पाणी सोडण्यात आले असून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने सांगोल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आ हे. पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
