बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (दि.६) मतदान होत असतानाच तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. लखीसराय जिल्ह्यात मतदानादरम्यान ‘राडा’ झाला. राष्ट्रीय जनता दल (RJD) समर्थकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या गाडीला घेराव घालत चप्पला फेकल्या आणि घोषणाबाजी केली. घटनास्थळावरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, आंदोलक “विजय सिन्हा मुर्दाबाद” अशा घोषणा देत उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाला अडवताना दिसत आहेत.
