ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याची गाथा साजरी करण्यासाठी पंढरपुर शहरात भव्य मोटर सायकल तिरंगा रॅली पार पडली. आमदार समाधान आवताडे व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वात या रॅलीला प्रचंड गर्दी होती. रॅलीची सुरुवात येथील टिळक स्मारक मैदान येथून करण्यात आली. तिरंगा रॅली पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा, प्रदक्षिणामार्गे गेली. याप्रसंगी हातात तिरंगा रॅलीत सहभागी आ. समाधान आवताडे, प्रणव परिचारक व अन्य.तिरंगा घेऊन आमदार समाधान आवताडे, युवक नेते प्रणव परिचारक यांनी रॅलीचे नेतृत्व केले.याप्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. टिळक स्मारक येथे रॅलीचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.रॅलीमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत आमदार समाधान आवताडे, युवक नेते प्रणव परिचारक यांचे नेतृत्वचव्हाण, तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष रोहित पानकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पंढरपूर बँकेचे चेअरमन सतीश मुळे, माऊली हळनवर, भाजपा माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट, उमेश सर्वगोड यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
मंगळवेढ्यातही मोठा प्रतिसाद भारतीय जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी गुरुवारी पंढरपूरप्रमाणेच मंगळवेढा शहरातही तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीला मंगळवेढावासियांनी मोठा प्रतिसाद दिला.
