पंढरपूर– सध्या नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे राज्यात महत्त्वाची असलेल्या पंढरपूर नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काळे, भालके, सावंत आणि आ.अभिजीत पाटील एकत्र बसल्याचे दिसून आले आहे. यावरून पंढरपूर नगरपरिषदेत सत्तांतर करण्यासाठी नवा आणि जुना विठ्ठल परिवाराचे मिलन झाल्याचे दिसून येत आहे. करकंब (ता. पंढरपूर) येथील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या खासगी हॉटेलमध्ये नव्या आणि जुन्या विठ्ठल परिवारांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.अभिजीत पाटील, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत, मनसे नेते दिलीप धोत्रे, काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील, एकनाथ शिंदेगटाचे शिवसेना नेते महेश साठे, युवराज पाटील, श्याम गोगाव उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूर शहराच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन निवडणूक लढवू आपल्यामधील मतभेद बाजूला ठेवू या. त्याचबरोबर, पुढे येणाऱ्या अनेक निवडणुकाही एकत्र येऊन सर्व विचाराने लढू या, असे एकमत झाले आहे. विठ्ठल परिवाराच्या या मनोमिलनामुळे शहरातील राजकारण फिरणार आहे.
फूट पाडण्याचं काम करतात त्यांना उद्ध्वस्त करू…
पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्याचबरोबर, येणाऱ्या महिन्याभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सगळ्या परिवारातील नेत्यांना एकत्र येण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सर्वांनी एकत्र येण्यास संमती दर्शविली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी बैठक घेत आहे.
पंढरपूर नगरपरिषद निवडणूकीसाठी सर्व प्रमुख नेतेमंडळी जो निर्णय घेतील, त्याच्यासोबत मी असणार आहे. विठ्ठल परिवारात फूट पाडायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करायच्या, हे काही मंडळींचे काम होती. त्याला आळा घालणं, कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका भारत भालके यांनी घेतली होती. तीच भूमिका आमच्च्या परिवारातील सर्व नेते एकत्र येऊन करतील
एकत्र येण्यास नगरपालिकेचा मुहूर्त
श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान विठ्ठल परिवाराचे विभाजन झाले होते. यामध्ये भालके, काळे गट एका बाजूला तर युवराज पाटील गट एका बाजूला असा तेढ निर्माण झाला होता. परिणामी, आमदार अभिजीत पाटील यांनी कारखान्यांची निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून अभिजीत पाटलांचा नवीन विठ्ठल परिवार तर भालकेंचा विठ्ठल परिवार वेगळा होता, परंतु हे पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र येण्यासाठी बैठक घेतली आहे.
जी चुकीची माणसे आहेत, जी आमच्या आमच्यात वेगवेगळ्या भूमिका, फूट पाडण्याचं काम करतात, त्यांना उद्ध्वस्त करण्या काम करणार आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत, त्यांना नगरपरिषदेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत संधी देऊ भगिरथ भालके माजी चेअरमन, विठ्ठल कारखाना
परिवार टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर आव्हान उभा राहण्याची शक्यता आहे. तर विरोधी आघाडीचे नेतृत्व आ. अभिजित पाटील आणि भगीरथ भालकेंकडे राहिल. विठ्ठल परिवारातील नेत्यांना सोबत ठेवण्याचं आव्हान असणार आहे.
