पंढरपूर – पंढरपूर नगर परिषदेची होणारी निवडणूक ही भाजपच्या चिन्हावरच लढविली जाणार आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवारदेखील भाजपचाच असणार आहे आणि चिन्ह ही भाजपचा असणार आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. पंढरपूर नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. याप्रसंगी आ. समाधान आवताडे, माजी आ. प्रशांत परिचारक, भाजपचे प्रणव परिचारक, सुभाष मस्के, लाला पानकर, माऊली हळणवर आदी उपस्थित होते. रिपाइंचे खासदार रामदास आठवले यांनीदेखील पंढरपुरातील स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत सांगितले, आहे पुढे गोरे म्हणाले, शहराचा विकास फक्त भाजपच करू शकतो. शहरातील अडचणी फक्त भाजप संपवू शकतो, असा विश्वास लोकांना आहे. यामुळे भाजपची उमेदवारी घेण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका प्रभागात आठ ते दहा लोक इच्छुक आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने किंवा स्थानिक गटाने जागा मागितल्या असतील, ज्याच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना जागा देण्यात येतील.
विरोधकांकडे उमेदवारदेखील नाहीत
समोर एकत्र झालेली यंत्रणा आहे. त्यांच्यापुढे मार्ग राहिला नाही. त्यांच्यात एकटा उभे राहण्याची व पॅनल उभे करण्याची क्षमता नाही. त्यांच्याकडे उभे करण्यासाठी उमेदवार नाहीत. आता सगळे विरोधक एकत्र येऊन उमेदवाराचा शोध घेत आहेत. शोध पूर्ण झाल्यानंतर आघाडी पूर्ण करतील आणि उभे राहतील, असे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
रिपाइंचे खासदार रामदास आठवले यांनीदेखील पंढरपुरातील स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत सांगितले, आहे
