अनगर – मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदाचा बहुमान हा राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना मिळणार आहे. प्राजक्ता पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे सादर केला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा बहुमान कोणाला मिळणार या सर्वांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक १४ मधून नारायण कल्याण गुंड यांचा तर प्रभाग ८ मधून वैशाली विष्णू पाचपुंड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे अर्ज दाखल केले आहेत अनगर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा असणाऱ्या अनगरची नगरपंचायत झाली आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी आज नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या उच्च शिक्षित बी. कॉम एल.एल.बी आहेत. लोकनेते (स्व) बाबूराव आण्णा पाटील अनगरकर यांनी अनगरसह वाड्यांची एकजूट बांधून ठेवली ती आजपर्यंत माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी ती पुढे सुरु ठेवली आहे
