निलंबित पीएसआय रणजित कासले याला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला त्याला बीड तुरुंगात ठेवले होते. पुढे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला संभाजीनगर येथील तुरुंगात हलवण्यात आले. आता कासले हा तुरुंगातून बाहेर आला आहे. त्यानंतर त्याने व्हीडीओ करत बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केला आहे. कासले म्हणाला, ‘मी बीडच्या तुरुंगात गेलो तर पाहिले की खास कपात वाल्मिक कराडला चहा दिला जातो. बाकीच्यांना प्लास्टिकचे कप आहेत. वाल्मिक कराडला पांघरण्यासाठी सहा ब्लॅकेट दिले आहेत. त्या ब्लॅकेटची गादी करून तो त्यावर आराम करतो. रोज त्याला वाचण्यासाठी सहा सहा पेपर आहेत. खायला चिकन मिळते. वाल्मिक कराडसाठी बीड जेल म्हणजे स्वर्ग आहे. कासले म्हणाला की, मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा विचारले की वाल्मिक कराड कुठे आहे. तर मला काही जणांनी दाखवले कराडची बराक कोणती आहे.
वाल्मिकला नागपूरच्या जेलमध्ये न्या…
कासले म्हणाला, बीडचा तुरुंग हा वाल्मिक कराडसाठी स्वर्ग आहे. धनंजय मुंडेंनी त्याला शब्द दिलाय की केस चार-पाच वर्षे चालेल त्यामुळे तुला बीडच्याच जेलमध्ये ठेवू. त्यामुळे मराठा बांधवांनी मागणी करावी की वाल्मिक कराडला नागपूरच्या, संभाजीनगरच्या किंवा कोल्हापूरच्या जेलमध्ये हलवावे. मी देखील अर्ज केला होती की त्याला दुसरीकडे हलवा.
