पंढरपूर – पंढरपूर संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेवून कार्यवाही करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पंढरपूर नगरपालिका क्षेत्रात 1 हजार 379 दुबार मतदार तर 46 तिबार मतदार असे 1 हजार 425 दुबार/तिबार मतदार असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सर्व मतदारांकडून कोणत्या प्रभागातील मतदान केंद्रांवर मतदान करणार याबाबतचे हमीपत्र घेण्यात येणार आहे . अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी तथा महेश रोकडे यांनी दिली. पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता दि.31 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर मतदार यादीमध्ये 18 प्रभागातील 2 हजार 827 ठिकाणी 1 हजार 425 दुबार /तिबार मतदार नोंद झालेली आ एकापेक्षा जास्त वेळा नाव असलेला मतदार हे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये हा प्रत्यक्षात एकच व्यक्ती आहे. याची खात्री झाल्यानंतर त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील मतदार केंद्रावर मतदान करणार आहे. या बाबतचे हमीपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. दुबार मतदारांना विचारात घेऊन त्यांच्या पसंतीने एकाच प्रभागात मतदान करता येणार आहे. दुबार मतदार नोंदीची माहिती प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध केली जाणार आहे. संबंधित मतदार एकापेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान करणार संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून केंद्रावर प्रतिसाद न मिळाल्यास असा मतदार मतदान मतदान करण्यासाठी आल्यास त्या मतदाराकडून त्याचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा देण्यात येईल. असेही सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
