झेंडे गल्ली परिसरातील भुयाचा मारुती ते मांडव खडकी मंदिरापर्यंत मागील एका वर्षापूर्वी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मात्र ड्रेनेज लाईनसाठी रस्त्यावर खोद काम झाल्यानंतर मुरूम न टाकता त्यातून निघालेली माती पसरल्याने पहिल्याच पावसात सबंध रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर सतीश शिंदे घर ते संजयबाबा ननवरे घर या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झेंडे गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर मठ आणि मंदिरे असल्याने पावसाळा सुरू झाल्याने तसेच आषाढी यात्रा जवळ आल्याने येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नगरपालिका प्रशासनाने भुयाचा मारुती ते मांडव खडकी मंदिर तसेच सतीश शिंदे घर ते संजयबाबा ननवरे घर हा रस्ता संजयबाबा ननवरे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी केली आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यास दुरावस्था झालेल्या रस्त्यावर चिखलात बसून आंदोलन करण्याचा इशा-रा समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
