पंढरपूर – पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी ८, तर नगरसेवक पदासाठी ३६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्याची मंगळवार १८ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत नगराध्यक्ष पदासाठी ८, तर नगरसेवक पदासाठी ३६६ दाखल उमेदवारी अर्जापैकी ३२१ मंजूर, तर ३९ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तसेच, ६ अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली. परिषद पंढरपूर नगर निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. नगराध्यक्ष पदासाठी ८, नगरसेवक पदासाठी ३६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या या अर्जाची छाननी मंगळवार रोजी नगर परिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १९ ते २१ नोव्हेंबर हा कालावधी असेल. २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
या वेळेत करण्यात आली छाननी
सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष व प्रभाग क्र. १ चे अर्ज, सकाळी ११.३० वाजता प्रभाग क्र.२, दुपारी १२.५ वाजता प्रभाग क्र. ३ व ४, दुपारी १ वाजता प्रभाग ५ व ६, दुपारी १.३० वाजता प्रभाग क्र.७ व ८, दुपारी २ वाजता प्रभाग क्र. ९ व १०, दुपारी ३ वाजता प्रभाग क्र.११ व १२, दुपारी ३.३० वाजता प्रभाग क्र.१३ व १४, दुपारी ४ वाजत प्रभाग क्र.१५ व १६ तर सायंकाळी ४.३० वाजता प्रभाग क्र.१७ व १८ मधील उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.
