मतदारांना मतदार यादीसंदर्भातील माहिती देणारी विशेष सघन पुन:परीक्षण (SIR) 2025 मोहिम सुरू झाली असून, घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये मतदार ओळखपत्रामध्ये असणाऱ्या सुधारणांनाही वाव मिळेल. या प्रक्रियेअंतर्गत मतदान प्रक्रियेतील केंद्रस्तरावरील अधिकारी (BLOs) घरोघरी जाऊन अर्जवाटप करतील, ज्यामाध्यमातून महत्त्वाची माहिती मिळवली जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं मतदारांना मतदारयादीतील त्यांच्या नावाची पडताळणी करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं प्रारुप मतदार यादी जाहीर केली असून, https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन ही यादी ऑनलाईन पद्धतीनं तपासता येईल. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी https://mahasec.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रारुप आणि अंतिम मतदार यादीची PDF प्रत मिळवण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावर भेट देण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. राज्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचेच वारे उधळताना दिसत असून, मतचोरीच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू केलं आहे. बोगस मतदारयादी आणि मतनोंदणीचा प्रकार उघडकीस आल्यामुळं सर्वसामान्य मतदारांनीसुद्धा आपल्या मतदार ओळखपत्राची पुनर्पडताळणी करण्याची गरज यातून निर्माण झाल्यानं आता नागरिकांना मतदारयादीतील आपलं नाव तपासण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
FAQ
निवडणुकांसाठी मतदार यादीची विशेष मोहीम का सुरू आहे?
मतचोरी, बोगस मतदार, डुप्लिकेट नावे आणि मतदार याद्यांमधील घोळ यामुळे सत्ताधारी-विरोधक दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने विशेष सघन पुनर्परीक्षण (Special Intensive Revision – SIR 2025) मोहीम सुरू केली आहे.
SIR 2025 मोहीम काय आहे?
विशेष सघन पुनर्परीक्षण 2025. यात बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी येऊन फॉर्म 5,6,7,8 वाटप करतात आणि मतदार यादीत नाव आहे/नाही, सुधारणा हवी का हे तपासतात. यावेळी नवीन नाव नोंदणी, सुधारणा, हटवणेही करता येईल.
माझं नाव मतदार यादीत आहे का ते ऑनलाइन कसं कसं तपासायचं?
दोन मुख्य वेबसाइट्सः https://mahasecvoterlist.in/ → येथे थेट नाव, ईपीक नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून शोधता येते.
https://mahasec.maharashtra.gov.in/ → प्रभागनिहाय/भागनिहाय प्रारूप मतदार यादी पहाता येते.
