श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे सुखकर पददर्शन घेता यावे यासाठी ऑनलाइन दर्शन पास बुकिंग संख्येत व वेळेत वाढ करण्यात आली आहे.
श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती या पंढरपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून भाविकांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पर्श दर्शन घेता येईल ज्यामुळे रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची आवश्यकता
राहणार नाही, सण, यात्रा, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत एकूण ६ स्लॉट निश्चित करून, प्रति स्लॉट ६०० आणि दिवसभरात ३६०० निःशुल्क दर्शनपास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंढरपूर शहर व परिसरातील महा-ई सेवा केंद्र येथे व मंदिर समितीमार्फ तदेखील लवकरच बुकिंग केंद्र स्थापन करून भाविकांना बुकिंगची सोय उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रथन आहे. दर्शन पास सुविधा निःशुल्क असून, यासाठी कोणत्याही प्रकारची मंदिर समिती फी आकारणार नाही. ६०० प्रमाणे दैनंदिन ३६०० पासेस उपलब्ध असणार आहेत. याशिवाय, जास्तीत जास्त १० दिवस अगोदर बुकिंग करता येणार असून, पासेस शिल्लक राहिल्यास त्याच दिवशी तत्काळ बुकिंग करता येईल. बुकिंग तारखेच्या दिवशी मंदिर परिसरातील
श्री संत तुकाराम भवन येथे १५ मिनिटे अगोदर भेट द्या. आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) दाखवा आणि पासची तपासणी करून, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
