ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा इतर कोणतीही अडचण आल्यास त्यांनी तात्काळ बीज वितरण कंपनीशी संपर्क साधण्यासाठी वीज वितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहेत. १९१२/ १८००२३३३४३५ /१८००१२२३४३५ या टोल फ्री क्रमांक संपर्क साधल्यास ग्राहकांची अडचण दूर होणार आहे. नागरिकांना घरबसल्या टोल फ्री ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकातून समाधान व्यक्त होत आहे. राज्यात वीज वितरण कंपनीचे ३ कोटीपेक्षा अधिक ग्राहक आहेत. अनेक ग्राहकांना कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहतात. यावेळी ते वीज वितरण कंपनीत फोन करतात; मात्र त्यांना योग्य उत्तर दिले जात नाही. तर काहीवेळी तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो म्हणून वीज वितरण कंपनीने ग्राहकाने थेट तक्रार करावी. यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहेत. या क्रमांकावर नागरिकांनी महाराष्ट्र विद्युत वितरण महा वितरण केल्यास याची नोंद ऑनलाईन घेतली जाते. याची सोडवणूक ताबडतोब करणे वीज वितरण कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना बीज खंडित व वीज बिलाबाबत तसेच इतर अडचणीबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास अडचण दूर होणार आहे. यामुळे तक्रार नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
