अकलूज- माळशिरस तालुक्यातील कोळेगावातील १७ शेतकन्यांच्या १२ एकरावरील केळी, ८ शेतकन्यांच्या २ एकरावरील डाळिंब, ६ शेतकन्यांच्या ७एकर क्षेत्रावरील पेरू, ६ शेतकन्यांच्या ७एकरावरील बोर व २ शेतकऱ्यांच्या ३ एकर क्षेत्रावरील शेवग्याचे नुकसान झाले आहे. तर, वेळापूर येथे वादळी बाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, बागा झोपल्या आहेत. तेथे ६ शेतकयांच्या १० एकरवरीन केळीचे नुकसान झाले आहे. नेवरे, उंबरे, दहिगात येथील ४५ ७७ शेतकऱ्यांच्या ६५ एकरावरील केळी, २२ शेतकऱ्यांच्या १२ एकरावरील डाळिंब, २६ शेतकन्यांच्या १८ एकरावरील शेवगा पिकाचे नुकसान झाले आहे. एकूण १३७ शेतकऱ्यांच्या १५० एकरावरील फळबागेचे नुकसान झाले आहे.
