राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Nagarparishad Election 2025) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे.
निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस- (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025)
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीडमध्ये सभा होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या त्रंबकेश्वर, संभाजीनगरमध्ये तर अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यसह नाशिकच्या भगूरमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस कसा गाजतो ते पाहावं लागेल.
मराठवाड्यात 17 पालिकांच्या कार्यक्षेत्रातील 38 प्रभागांची निवडणूक लांबणीवर-
मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 17 पालिकांच्या कार्यक्षेत्रातील 38 प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधिक उमेदवारांनी अर्ज छाननीत आक्षेप घेतले होते. अधिकाऱ्यांचा निर्णय संबंधितांना मान्य नव्हता. त्यामुळे उमेदवारांनी कार्टात धाव घेतली होती. न्यायालयात या हरकतींचा निकाल 23नोव्हेंबरनंतर लागला. तो पथका अर्ज माघारीची मुदत निधून गेली होती. तसेच चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे संबंधितांना प्रचाराल वेळ कमी मिळाला. म्हणून राज्य निवडणूक निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहे.
कुठे संपूर्ण निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार? (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed)
पुणे जिल्ह्यातील बारामती, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सोलापूरमधील मंगळवेढा, अनगर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी.
