राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला असूनआता प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या (Sangole) राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. सांगोल्यात पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाकडून (Election Commission) धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे. भाजपासह शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात भरारी पथकाकडू झाडाझडती घेत तपासणी केली जात आहे. सांगोल्याचे (Sangole) शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या कार्यालयावरही धाड टाकण्यात आली होती. त्यांनतर आता भाजप, शेकाप, राष्ट्रवादी यांच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात ही पथकाकडून तपासणी केली जात असल्याची माहिती आहे.
Sangola Election : सांगोल्यात पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाड सत्र!
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सांगोल्यात महात्मा फुले चौकातील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाकडून (Election Commission) हि तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाई मागील नेमकं कारण काय? या छाप्यात नेमकं काय सापडले? याबाबत अजून काहीही माहिती समजली नसली तरी या धाड सत्राने सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उड़ली आहे. तर तपासअंती या कारवाईमागील सत्य समजू शकणार आहे.
Maharashtra politics : सांगोल्यात चुरशीची लढत, युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले?
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.
Shahajibapu Patil : दीपक साळुंखे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंचे षडयंत्र
दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची रविवारी सभा संपताच शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. याच पद्धतीने बापूंच्या जवळ असणाऱ्या इतरही काही ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे. दरम्यान या बाबत आता शहाजीबापूंनी प्रतिक्रिया देत या मागे माजी आमदार दीपक साळुंखे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे असून त्यांनीचे हे षडयंत्र रचल्याचे आरोप शहाजीबापूंनी केलाय.
Devendra Fadnavis : याला वेगळा रंग देण्याचे कारण नाही
तर दुसरीकडे या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले कि, या संदर्भात मला अधिक माहिती नाही. मात्र अशा कारवाई आमदार सत्तेतील आहे कि विरोधातला हे बघितलं जात नाही. नक्कीच तक्रार दाखल झाली असेल त्या अनुषंगाने तपास केला जाईल. कित्येकदा आमची देखील गाडी तपासली जाते. त्यामुळे याला वेगळा रंग देण्याचे कारण नाही. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
